कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,आर्वी येथे राष्ट्रीय मतदार दिन साजरा…

*कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,आर्वी येथे राष्ट्रीय मतदार दिन साजरा…*
आर्वी ,-: कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,आर्वी येथे राज्यशास्त्र विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व निवडणूक विभाग तहसील कार्यालय,आर्वी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिन सोबतच विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण हा कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इतिहास विभाग प्रमुख डॉ.दीपक चव्हाण होते.तर प्रमुख अतिथी म्हणून तहसील कार्यालय आर्वी येथील निवडणूक नायब तहसीलदार सौ स्मिता माने उपस्थित होत्या. सोबतच महाविद्यालयातील मराठी विभागाचे डॉ. सुधाकर भुयार व रासेयो कार्यक्रम अधिकारी, राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.आशिष पेठे उपस्थित होते. यावेळी सर्वप्रथम मतदार जनजागृती सप्ताह अंतर्गत विविध शाळा, महाविद्यालय मध्ये घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धा,रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा इत्यादींमध्ये प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना तहसील कार्यालय, आर्वी यांचे मार्फत प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. नायब तहसीलदार निवडणूक सौ.स्मिता माने यांनी मतदान जागृती चे व मतदानाचे महत्त्व सांगून नोंदणीसाठी आवाहन केले. प्रमुख पाहुणे डॉ.सुधाकर भुयार यांनी मतदाराचे कर्तव्य याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.दीपक चव्हाण यांनी मतदान हे नागरिकांचे कर्तव्य असून प्रत्येकाने ते बजावायला पाहिजे असे सांगितले. आपल्या प्रास्ताविकातून प्रा.आशिष पेठे यांनी नवीन अठरा वर्षावरील विद्यार्थ्यांनी मतदान नोंदणीसाठी समोर यावे व आजपासून मतदान नोंदणीचा कार्यक्रम महाविद्यालयीन स्तरावर सुरू करण्यात येत असल्याची सांगितले.जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपली मतदान नोंदणी करावी असे निवेदन केले. यावेळी महाविद्यालयातील कर्मचारी व बीएलओ म्हणून कार्यरत असलेले डॉ.गणेश मस्के, श्री.चंद्रशेखर डोंगरे व श्री.कैलास दहाट यांनी मतदानाची शपथ उपस्थितांना दिली.
कार्यक्रमाचे संचालन प्रा.अमर भोगे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.दर्शनकुमार चांभारे यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता तहसील कार्यालय, आर्वी येथील निवडणूक विभाग संगणक चालक श्री.प्रशांत येवतकर व शिपाई श्री.पठाण यांनी मदत केली. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.