आर्वी / वर्धा जिला की ख़बर
स्वच्छता अभियान राबवून संत गाडगे महाराज यांना केले अभिवादन

*स्वच्छता अभियान राबवून संत गाडगे महाराज यांना केले अभिवादन*
आर्वी :- स्थानिक नगर परिषद गांधी विद्यालय मधील सर्व एनसीसी छात्रसैनिक तसेच स्टुडन्ट पोलीस कॅडेटच्या विद्यार्थ्यांनी दिनांक 23 फेब्रुवारी सकाळी शाळेची प्रार्थना झाल्यानंतर संपूर्ण शालेय परिसर तसेच शाळेबाहेरील परिसर स्वच्छ करून कर्मयोगी संत गाडगे महाराज यांना खरी आदरांजली वाहिली याप्रसंगी एनसीसी अधिकारी प्रमोद नागरे यांनी संत गाडगे महाराज यांच्या स्वच्छते विषयीचे तसेच अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यावर तसेच पुरोगामी विचारांवर प्रकाश टाकला .विद्यार्थ्यांना स्वच्छतेची आवड ही शालेय जीवनापासूनच लागायला हवी जेणेकरून आपल्या गाव ते देश पातळीवर सुद्धा स्वच्छ ते चे महत्त्व पटवून द्यायला मदत होईल. याप्रसंगी प्राचार्य उषा नागपुरे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.