अमरावती(ग्रामिण) व भातकुली उपविभाग मद्धे लाईनमन दिवस उत्साहात साजरा

*अमरावती(ग्रामिण) व भातकुली उपविभाग मद्धे लाईनमन दिवस उत्साहात साजरा:*
भारत सरकारचे आदेशान्वये सर्व सार्वजनिक व खाजगी विद्युत क्षेत्रातील सेवा देत असलेल्या लाईंनमनच्या सेवेची दाखल घेऊन त्यांच्या कामाप्रती सदभावना व्यक्त करण्यासाठी *दी. 4 मार्च 2023* हा दिवस संपूर्ण भारतामध्ये *लाईनमन दिवस* म्हणून साजरा करण्यात येत आहे.
त्याअनुषंगाने अमरावती ग्रामीण उपविभाग व भातकुली उपविभाग यांचे संयुक्त विद्यमाने *लाईनमन दिवसाचे* आयोजन करण्यात आले.त्यामध्ये सर्व जनमित्र,यांत्रचालक, तांत्रिक कर्मचारी, बाह्यस्त्रोत तांत्रिक कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी विविध विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री.अनिरुद्ध आलेगावकर, कार्यकारी अभियंता, अमरावती ग्रामीण हे होते.
श्री. रवींद्र चौधरी,अतिरिक्त कार्यकारी अभियंता,अमरावती ग्रामीण विभाग यांनी विजवाहिनिवर काम करत असताना घ्यावयाची दक्षता आणि सुरक्षित साधनांचा योग्य वापर मार्गदर्शन केले.
श्री.चांडक,सहाय्यक अभियंता,विद्युत निरीक्षक कार्यालय,अमरावती यांनी विजवाहिनी/रोहित्र यांची सुरक्षित उभारणी,त्यासंबंधित नियम आणि कायदे याविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे आर्थिक आणि मानसिक स्वास्थ्य नियोजनाबाबत यथोचित माहिती दिली.
श्री. नांदुरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक, अमरावती यांनी रस्ते अपघात व सुरक्षा आणि नियम याविषयी सखोल माहिती दिली.
तांत्रिक कर्मचारी यांचेमधून
श्री.नरेंद्र भूजाडे, मुख्य तंत्रज्ञ, अमरावती ग्रामीण उपविभाग.
श्री.स्वप्नील कुऱ्हाडे, वरिष्ठ तंत्रज्ञ, विजय सोळंके.
शिराळा शाखा.
श्री. मंगेश खंडारे,भातकुली उपविभाग.
श्रीकांत चुटके, वरिष्ठ तंत्रज्ञ, विभागीय कार्यालय, अम. ग्रा.
मनीषा कांबळे, दिलीप हणवते, रोशन चोखट, रहाटगाव शाखा कार्यालय.
यांनी आपले मनोगत मांडले आणि अनुभव कथन केले.
सदर कार्यक्रमास अमरावती ग्रामीण आणि भातकुलि उपविभागामधून १०० पेक्षा जास्त कर्मचारी उपस्थित होते.
दिवस: शनिवार
दि: ४ मार्च २०२३
वेळ : सकाळी ठीक ९:००वा. ते 1:30pm
स्थळ: अमरावती उपविभाग