आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त मिलेट दौडचे आयोजन करण्यात आले होते. या दौडला सर्व वयोगटातील स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग झाला. दौडमधील विजेत्यांना खा.रामदास तडस यांच्याहस्ते बक्षिसे वितरण करण्यात आले.

मिलेट दौडमधील विजेत्यांना पुरस्कारांचे वितरण
वर्धा, दि. 8 (जिमाका) : आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त मिलेट दौडचे आयोजन करण्यात आले होते. या दौडला सर्व वयोगटातील स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग झाला. दौडमधील विजेत्यांना खा.रामदास तडस यांच्याहस्ते बक्षिसे वितरण करण्यात आले.
बक्षिस वितरण प्रसंगी खासदारांसह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॅा.विद्या मानकर, कृषी विज्ञान केंद्र सुलसुराचे प्रमुख डॅा.जीवन कतोरे उपस्थित होते. मिलेट दौडमध्ये 135 पेक्षा जास्ता मुला मुलींनी सहभाग घेतला होता. यामध्ये वय 8 ते 16, 16 ते 18 वर्षे व 18 वर्षावरील असे तीन गट पाडण्यात आले होते. 18 वर्षावरील गटात खुल्या गटात सनी अर्जुन फुसाटे यांनी प्रथम संजय ब्रिजलाल पटेल द्वितीय, वैभव विजय खुरसाने तृतीय, पुष्पक विनोद सायंकार चतुर्थ तर प्रयास कोल्हे यांनी पाचवा क्रमांक पटकावला.
वयोगट 16 ते 18 मध्ये नयन चंद्रशेखर भगत प्रथम, हर्शल गजानन चिडाम द्वितीय, आदेश अरुण गुजरकर तृतीय, प्रेम राजेंद्र सोनुरकर यांनी चतुर्थ क्रमांक पटकावला. वयोगट 16 वर्षखालील गटीत प्रथम पुरस्कार रिषभ गोविंद रहांगडाले, द्वितीय सम्यक किशोर जारोंडे, तृतीय यश प्रमोद कटवे, चतुर्थ सार्थक सुनील कोडापे यांनी तर पाचवा पुरस्कार राज नरेन्द्र हांडे यांनी पटकाविला.
या सर्व विजेत्यांना खासदार रामदास तडस यांच्याहस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले व सर्व सहभागी खेळाडूंना प्रशस्तीपत्र देण्यात आले. पौष्टिक तृणधान्याचा आहारामध्ये समावेश वाढावा व त्याबाबत समाजात जनजागृती व्हावी, यासाठी ही दौड आयोजित करण्यात आली होती.
या दौडमध्ये कमलनयन बजाज फाउंडेशन, वर्धा सोशल फोरम, महाराष्ट्र ॲग्रो इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, बँक ऑफ इंडिया, अवचट ऍग्रो इंजीनियरिंग, रामकृष्ण बजाज कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर, कृषी विज्ञान केंद्र सेलसुराचे सर्व अधिकारी व कर्मचारी, महाबीजचे श्री.राठोड व अधिकारी व कृषी विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी पारितोषिकांचे प्रायोजकत्व घेऊन आपले सहकार्य नोंदविले.
दौडसाठी ॲथलेटीक असोसिएशनचे सचिव रमेश भुटे, सदस्य राजेश उमरे, प्रविण बोरले, सुनयना डोंगरे आणि प्रफुल्ल गेडाम यांनी मिलेट दौडचे संचालन व पंच म्हणून जबाबदारी सांभाळली.
000000