नुकसान पाहणी च्या नावाखाली होणारी नौटंकी आजी माजी आमदार व खासदार यांनी बंद करावी :- बाळा जगताप.. (दोन महिन्यात पुराव्या सहित ही नौटंकी उघडी पाडू)

*नुकसान पाहणी च्या नावाखाली होणारी नौटंकी आजी माजी आमदार व खासदार यांनी बंद करावी :- बाळा जगताप*
(दोन महिन्यात पुराव्या सहित ही नौटंकी उघडी पाडू)
आर्वी :- सद्या सगळीकडे अतिवृष्टी चालू आहे. त्यात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येत आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळित होत असताना जनतेला मोठ्या नुकसानाला समोर जावे लागत असताना आपले आजी माजी आमदार खासदार पाहणी दौरे करत आहे. मात्र हे दौरे म्हणजे पोकळ नौटंकी असल्याची टीका बाळा जगताप यांनी केली आहे. गेल्या २५ ते ३० वर्षापासून दरवेळी नुकसान पाहणी करण्यात येते. मात्र नुकसान ग्रस्त परिवाराला त्या शेतकऱ्याला कधीही नुकसान भरपाई मिळत नाही. दोन्ही आजी माजी आमदार आणि खासदार पाहणी करून फोटोसेशन करून निघून जातात मात्र त्या कुटुंबाला भरपाई मिळावी याकरिता कधीच शासनापर्यंत पाठपुरावा करीत नाही. आताही तीच स्थिती आहे. आर्वी तळेगाव रस्त्याचे काम व्हावे ही एकाही आजी माजी लोकप्रतिनिधी ची इच्छा नाही. आणि त्याच रस्त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांचे या पावसाळ्यात नुकसान झाले. तरी ही पाहणी आणि भेटीची नौटंकी सुरूच आहे. येत्या दोन महिण्यानंतर आम्ही या नेत्यांनी जेथे जेथे भेटी दिल्या आश्वासने दिले तेथे तेथें भेट देऊन पुराव्यासहित यांची फोटोसेशन ची नौटंकी उघडी पाडू असे आव्हानच बाळा जगताप यांनी या नेत्यांना दिले…