जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करणेसाठी आज दिनांक १४ मार्च २०२३ रोज मंगळवार पासून बेमुदत संप सुरू झालेला असून या बेमुदत संपाला नगर परिषद आर्वी जिल्हा वर्धा मधील सर्व कर्मचारी अधिकारी , सफाई कामगार संघटनांनी पाठिंबा दिला असून या संपात आज पासून पूर्णतः उस्फूर्तपणे सहभागी झालेले आहेत.

*एकच मिशन जुनी पेन्शन*
आर्वी :- संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील राज्य शासकीय, निमशासकीय, शिक्षक व शिक्षकेत्तर सर्व कर्मचारी यांचा जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करणेसाठी आज दिनांक १४ मार्च २०२३ रोज मंगळवार पासून *बेमुदत संप* सुरू झालेला असून या बेमुदत संपाला नगर परिषद आर्वी जिल्हा वर्धा मधील सर्व कर्मचारी अधिकारी , सफाई कामगार संघटनांनी पाठिंबा दिला असून या संपात आज पासून पूर्णतः उस्फूर्तपणे सहभागी झालेले आहेत.
याच संपाचा एक भाग म्हणून *उद्या दिनांक १५ मार्च २०२३ रोज बुधवार ला सकाळी १०.०० वाजता भव्य मोरच्याचे आयोजन करण्यांत आलेले असून* त्यात सर्व संघटनांचा सहभाग राहणार आहे..
शासन स्तरावर आमच्या मागण्या मान्य होई पर्यंत हा बेमुदत संप सुरू राहणार आहे…
विनीत
१) संजय अंभोरे
वर्धा जिल्हाध्यक्ष
२) साकेत राऊत
तालुका अध्यक्ष
न. प.कर्मचारी संघटना,
३) आकाश चावरे
तालुका अध्यक्ष
सफाई कामगार संघटना
नगर परिषद आर्वी
जिल्हा वर्धा.
व सर्व अधिकारी कर्मचारी, सफाई कामगार वृंद
नगर परिषद आर्वी जिल्हा वर्धा..