आर्वी / वर्धा जिला की ख़बर

मराठी भाषा सवर्धन पंधरवडा शालेय व महाविद्यालयीन स्पर्धांचे पुरस्कार वितरण

VIGYAPAN
photostudio_1633317682627
photostudio_1664351103597
IMG_20220927_150515_046
photostudio_1675928066038
photostudio_1675928029715

मराठी भाषा सवर्धन पंधरवडा
शालेय व महाविद्यालयीन स्पर्धांचे पुरस्कार वितरण

वर्धा, : जिल्हाधिकारी कार्यालय आणि माध्यमिक शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता आयोजित विविध स्पर्धांचे पुरस्कार वितरण स्थानिक सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालयात करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची आणि साहित्याची अभिरुची निर्माण व्हावी, यासाठी शिक्षण विभागाद्वारे आठवी ते दहावी, अकरावी व बारावी आणि खुला गट अशा तीन गटांकरिता माझा मराठीची बोलू कौतुके या विषयावर वक्तृत्त्व स्पर्धा, मराठी भाषा काल, आज आणि उद्या यावर निबंध स्पर्धा आणि वाचलेल्या पुस्तकावरील समिक्षा लेखन या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
स्थानिक यशवंत महाविद्यालयात आयोजित या उपक्रमाला विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. स्पर्धेतील पुरस्कार विजेत्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, अतिरिक्त जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप, उपशिक्षणाधिकारी उषा तळवेकर, कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे, कवी संजय इंगळे तिगावकर, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, शिक्षा मंडळाचे मंत्री संजय भार्गव यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमात आनंद निकेतन विद्यालय, यशवंत विद्यालय (सेवाग्राम), आनंदराव मेघे विद्यालय (बोरगाव), अग्रगामी कॉन्व्हेन्ट (मसाळा), प्रभात पब्लिक स्कूल (मांडवगड), अग्रगामी स्कूल (पिपरी मेघे), इंडियन मिलिटरी स्कूल (पुलगाव), यशवंत विद्यालय (वायगाव), स्कूल ऑफ स्कॉलर्स, सेंट अँथोनी स्कूल (सावंगी मेघे), महिला आश्रम अध्यापक विद्यालय, सुशील हिम्मतसिंगका विद्यालय, कुंभलकर समाजकार्य महाविद्यालय, यशवंत कला महाविद्यालय, प. शहीद हमीद उर्दू स्कूल, मौलाना आझाद उर्दू स्कूल, केसरीमल कन्या शाळा, भारत ज्ञान मंदिर, स्कूल ऑफ ब्रिलियंट, रात्नीबाई विद्यालय, जा.ब.विज्ञान महाविद्यालय, न्यू इंग्लिश हायस्कूल, न्यू इंग्लिश कॉन्व्हेन्ट, लोक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, जगजीवनराम हायस्कूल, न्यू आर्ट्स महाविद्यालय, सरस्वती विद्या मंदिर, मॉडेल हायस्कूल, मधुबन कॉन्व्हेन्ट, विकास विद्यालय, संत तुकडोजी महाराज विद्यालय या शाळेतील विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजनात मराठी भाषा समितीचे सदस्य प्रा. पद्माकर बाविस्कर, डॉ. रत्ना चौधरी, आशीष पोहाणे तसेच विविध शाळा आणि महाविद्यालयांचे मुख्याध्यापक व शिक्षकांचे सहकार्य लाभले.
000000

Related Articles

Back to top button
Close
Close