डॉ राणे होणार विदर्भ प्रांताचे प्रांतपाल…. प्रथम उपप्रांतपाल पदासाठी डॉ.रिपल राणे यांनी केला अर्ज दाखल …. 2024-25 मध्ये डॉ राणे होणार विदर्भ प्रांताचे प्रांतपाल…. ऑस्ट्रेलिया मधील मेलबर्न शहरात होणार डॉ. राणे यांचा शपथविधी….

डॉ राणे होणार विदर्भ प्रांताचे प्रांतपाल….
प्रथम उपप्रांतपाल पदासाठी डॉ.रिपल राणे यांनी केला अर्ज दाखल ….
2024-25 मध्ये डॉ राणे होणार विदर्भ प्रांताचे प्रांतपाल….
ऑस्ट्रेलिया मधील मेलबर्न शहरात होणार डॉ. राणे यांचा शपथविधी….
आर्वी :- विदर्भ प्रांत 3234H1 चे दुसरे उपप्रांतपाल, व्यवसायाने अस्थिरोग तज्ञ असलेले डॉ. राणे यांनी आज मोठ्या उत्साहात आणि आनंदाने नामनिर्देशन अधिकारी लायन विजयजी पालीवाल (PDG) यांच्याकडे प्रथम उपप्रंतपाल पदासाठी उमेदवारी नोंदवली. यावेळी गोंदिया, भंडारा, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर येथून लायन डॉ.राणे यांचे सर्व चाहते व समर्थक उपस्थित होते.
सन 2024-25 मध्ये डॉ. रिपल राणे यांची विदर्भातील आठ जिल्ह्यांचा समावेश असलेल्या 3234H1 या प्रांताच्या उपप्रंतपाल पदी नियुक्ती होणार असून त्यांचा शपथविधी सोहळा ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरात होणार आहे.
अत्यंत अल्पावधीत डॉ.राणे हे त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे संपूर्ण विदर्भ प्रांतात लोकप्रिय झाले आहेत. त्यांची नेतृत्व क्षमता आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची शैली, यामुळे त्यांनी नेहमीच सर्वांना प्रभावित केले आहे.
या प्रसंगी प्रांताचे सर्व माजी गव्हर्नर, प्रांताचे सर्व सल्लागार, कॅबिनेट अधिकारी आणि मोठ्या संख्येने लायन्सचे पदाधिकारी व सर्व सदस्य उपस्थित होते.
डॉ.राणे यांच्या उमेदवारीसाठी व पुढील सामजिक कार्यासाठी त्यांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या.