ओशिन बंब ने लावला येसंबा येथे महापाषाणिय शिलावर्तुळांचा शोध*

*ओशिन बंब ने लावला येसंबा येथे महापाषाणिय शिलावर्तुळांचा शोध*
वर्धा:- जिल्ह्यातील येसंबा गावाजवळच्या पठारावर पुरातत्वीय लोहयुगीन काळातील ७१महापाषाणिय शिलावर्तुळांचा शोध डेक्कन कॉलेज पुणे येथे पीएचडी करत असलेला संशोधक ओशिन बंब याने लावला असुन त्याची नोंद सुप्रसिद्ध जर्नल ऑफ हीस्ट्री आर्कियालोजी एन्ड आर्किटेक्चर च्या २०२२च्या विशेस अंकात प्रसिद्ध झाली आहे. ही शोधलेली शिलावर्तुळे अंदाजे अडीच हजार वर्षांपूर्वी ची असुन आदिम समाजातील विशिष्ट दफन पद्धत आहे. यापूर्वी विविध ठिकाणी झालेल्या उत्खननातुन समोर आले आहे की तत्कालीन समाजात आपल्या मृत पुर्वजांना अत्यंत आदरपूर्वक व विशिष्ट पद्धतीने जमिनीत पुरविण्याची पद्धत होती.ज्यात मृत व्यक्ती च्या संबंधित लोखंडी.तांबे व मिश्रधातू ची अवजारे ,कधी कधी पशू सोबत दफन करत होते.हे प्रत्यक्ष उत्खननातील पुराव्यावरून लक्षात आले. येसंबा येथे सुद्धा अशा प्रकारची पद्धत प्रचलित असावी असे संशोधक ओशिन बंब यांचे मत आहे.विदर्भात लोहयुगिन अनेक स्थळे अस्तित्वात आहे .ईंग्रजानंतर नागपूर विद्यापीठ, डेक्कन कॉलेज पुणे,व महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागाचे वेगवेगळ्या ठिकाणी संशोधन सुरू आहे.येसंबा येथे सापडलेल्या शिला वर्तुळाच्या रचनेमध्ये बाहेर मोठे दगड वेगवेगळ्या आकाराचे असुन आतमध्ये लहान दगडांनी भरलेले दिसुन आले.कदाचित पुनर्जन्म आणि मृत व्यक्ती बद्दल आदर भाव या कारणांमुळे तत्कालीन ग्रामीण संस्कृतीमध्ये ही विशेष दफनविधी परंपरेने प्रचलित होती.शिलावर्तुळाच्या आकारावरून व मिळालेल्या दफन सामग्री वरून व्यक्ती च्या सामाजिक स्तरा चा परिचय होतो असे काही अभ्यासकांचे मत आहे.येसंबा येथिल ही शिलावर्तुळे संरक्षित असणे आवश्यक आहे कारण गिट्टी मुरुम ह्याच्या अतिरेकी ऊपसा वाढत गेल्यामुळे ही धरोहर धोक्यात आल्याचे दिसून येते.त्यांना ही शिलावर्तुळे शोधण्यासाठी स्थानिक रहिवासी श्री पंचशील थूल यांनी मोलाचे सहकार्य केले. वर्धा जिल्ह्याच्या व विदर्भाच्या इतिहासात ह्या संशोधनाने भर पडली असुन अधिक संशोधन होणे गरजेचे आहे असे मत ओशीन बंब यांनी व्यक्त केले.