श्री संत लहानुजी महाराज संस्थान, श्रीक्षेत्र टाकरखेडा, ता. आर्वी, इंडियन रेडक्रॉस सोसायटी, शाखा आर्वी व वर्धा, वैद्यकिय जन जागृती मंच, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने रोग निदान व निःशुल्क औषधी वितरण बालकांची तपासणी आरोग्य महाशिबिर सांस्कृतिक हॉल श्री संत लहानुजी महाराज संस्थान, टाकरखेडा येथे संपन्न

आर्वी :-श्री संत लहानुजी महाराज संस्थान, श्रीक्षेत्र टाकरखेडा, ता. आर्वी, इंडियन रेडक्रॉस सोसायटी, शाखा आर्वी व वर्धा, वैद्यकिय जन जागृती मंच, वर्धा यांच्या
संयुक्त विद्यमाने रोग निदान व निःशुल्क औषधी वितरण बालकांची तपासणी आरोग्य महाशिबिर सांस्कृतिक हॉल श्री संत लहानुजी महाराज संस्थान, टाकरखेडा येथे संपन्न झाले
सर्वप्रथम श्री संत लहानुजी महाराज यांच्या फोटोचे पूजन व दिप प्रज्वलनाने महा शिबिराला सुरुवात झाली
या कार्यक्रम प्रसंगी श्री अशोक विठ्ठलदासजी राठी मॅनेजिंग डायरेक्टर, सीडेट कंपनी लिमिटेड तळेगाव, तसेच श्री अशोकराव पावडे यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी श्री संत लहानुजी महाराज संस्थान टाकरखेड चे अध्यक्ष सुरेशराव पावडे ,इंडियन रेडक्रॉस सोसायटी शाखा आर्वीचे संस्थापक सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ अरुण पावडे, एडवोकेट विनोद देशपांडे, अनिल भट ,नंदकिशोर दीक्षित, इंडियन रेडक्रॉस सोसायटी शाखा आर्वी चे उपाध्यक्ष अरुण ढोक, सचिव डॉ अभिलाष धरमठोक ,कोषाध्यक्ष डॉ प्रा रवींद्र सोनटक्के, संस्थानाचे संचालक रमेशराव जवळेकर, अनिलराव अनासने, शरदराव वानखेडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते
विविध आजारासंबंधी 317 रुग्णांची तपासणी या महा शिबिरामध्ये करण्यात आली शिबिरामध्ये जनरल फिजिशियन डॉ देवेंद्र खंडेलवाल डॉ श्रीकांत देशपांडे, दंतरोग डॉ आशिष सोनी, डॉ भूषण अग्रवाल, डॉ भाग्यश्री बोके ,डॉ शिवानी ठाकरे ,डॉ ,हर्षाली धरमठोक, शल्यरोग तज्ञ डॉ तुषार नागतोडे, डॉ अविनाश लव्हाळे, नेत्ररोग तज्ञ डॉ मोहनजी सुटे,डॉ सिद्धार्थ वंजारी ,डॉ प्रदीप सुने, स्री रोग तज्ञ डॉ शितल होले, डॉ प्रतिभा पावडे डॉ स्मिता पावडे( वर्धा)डॉ मीना हिवलेकर( वर्धा )हृदयरोग तज्ञ डॉक्टर अरुण पावडे, डॉ राजेश सरोदे( वर्धा )डॉ हर्षल पावडे( वर्धा) आयुर्वेदिक डॉ श्याम भुतडा डॉ राधाकृष्ण सायरे(, वर्धा )डॉ अनिता ठाकरे ,डॉ अनिता भुतडा, होमिओपॅथिक तज्ञ डॉ प्रकाश धांदे, डॉ उमेश गुल्हाने डॉ प्रमोद जाणे ,शुगर व बीपी तपासणी डॉ विनय देशपांडे ,प्रवीण देशमुख , बालरोग तज्ञ डॉक्टर सचिन हिवसे, डॉसचिन पावडे( वर्धा )डॉ नंदकिशोर कोल्हे डॉ भूषण होले ,डॉ शंतनू चव्हाण ,डॉ भागवत राऊत ,डॉ उषा कौरासे ,डॉ अरुण भगत आदि तज्ञ डॉक्टरांनी रुग्णाची तपासणी करून त्यांना मोफत औषध वितरित करण्यात आले
महा शिबिर यशस्वी करण्याकरता वैद्यकीय मंच व इंडियन रेडक्रॉस सोसायटी वर्धाचे श्याम भाऊ भेंडे ,अनंत बोबडे, सदानंद सावरकर, प्रभाकर राऊत, हितेश इमाने राजेंद्र ठाकरे, संजय कैलूक़े, प्रकाश अग्रवाल ,मोहन मिसाळ अरविंद लोहे ,प्रा शेख हशम, माणिकराव झाडे, गौळकर, इंडियन रेड क्रॉस सोसायटी शाखा आर्वीचे प्राध्यापक रमेश जवंजाळ,डॉ प्राचार्य हरिभाऊ वेरुळकर, प्रमोद पाटणी, श्रीकांत कलोडे ,लक्ष्मणराव आगरकर,डॉ सतिश ठाकरे,किशोर चोरडिया,प्रा अभय दर्भे, सुशील ठाकूर, प्रेम सिंग राठोड ,सुशील लाठीवाला,सुनील कटियारी, प्रफुल ठाकरे, प्रवीण शिरपूरकर ,रवी शहा ,प्रा नितीन बोडखे, दिनेश चोरडिया मोहन चांडक, विनय चोरडिया ,जाकीर हुसेन, संदीप बुधवानी, दर्शन चांभारे , लहानू अभ्यासिकेचे विद्यार्थी शुभम नांदने, देवेश कुरवाडे, दुष्यम कालोकर, गौरव टरके, प्रफुल धुर्वे, तुषार उंदरे, अजय खैरकर ,आकाश राठोड ,धीरज इंगळे, आदित्य मडामे, संकेत जगताप, पवन पाचघरे ,प्रसाद हांडे, स्वप्निल कांबळी आदींनी परिश्रम घेतले