आर्वी / वर्धा जिला की ख़बर

सर्व जेष्ठ नागरिकांनी कोरोना लसीकरनाचा लाभ घ्यावा …..* *हे लसीकरण पूर्णपणे सुरक्षीत आहे…डॉ रिपल राणे

VIGYAPAN
photostudio_1634614114400
photostudio_1633317682627
IMG-20211129-WA0031

सर्व जेष्ठ नागरिकांनी कोरोना लसीकरनाचा लाभ घ्यावा …..
हे लसीकरण पूर्णपणे सुरक्षीत आहे…….
*डॉ रिपल राणे*

*राणे हॉस्पिटल आर्वी येथे आता पर्यंत सातशेहुन अधिक जेष्ठ नागरिकांनी घेतला लसीकरणाचा लाभ*

45 वर्षाखालील ज्यांनी कोरोना काळात *”फ्रन्ट लाइन वर्कर”* म्हणून कार्य केले आहे ते सुद्धा घेऊ शकतात लस….

शासनातर्फे सर्व जेष्ठ नागरीकांसाठी कोरोना लसीकरण कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याअंतर्गत नागरीकांनी लसीकरणाचा लाभ घेऊन स्वतःला सुरक्षित करावे.
दिनांक 1 मार्च 2021 पासून संपूर्ण भारतात जेष्ठ नागरिकांसाठी कोरोना लसीकरणाची सुरवात झाली असून वर्धा जिल्ह्यातून राणे हॉस्पिटल, आर्वी या एकमेव खाजगी रुग्णालयाला लसीकरणाची परवानगी शासनाने दिली आहे .
आतापर्यंत साठ वर्षावरील सर्व व पंचेचाळीस वर्षावरील ज्यांना काही व्याधी आहे अश्या सातशेहून अधिक नागरिकांनी या लसीकरण शिबिराचा लाभ घेतला आहे. विशेष बाब म्हणजे आपल्याला समाजाला काही देने आहे हे सामाजिक द्वायित्व समजून डॉ. रिपल राणे व डॉ. सौ. कालिंदी राणे स्वतः सर्व नागरिकांना लसीकरण करीत आहेत व त्यामुळे सर्व नागरिकांमध्ये या लसीकरणाच्या मोहिमेबद्दल आत्मविश्वास वाढला आहे हे विशेष.
आपल्या शासनाने सर्वांच्या सुरक्षितेसाठी लसीकरणाचे उत्कृष्ट असे नियोजन केले असून ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे व सध्यातरी कोरोना विरोधात लढण्यासाठी या शिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही, म्हणून सर्व नागरिकांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ रिपल राणे यांनी सर्व जनतेला केले आहे.

आर्वी शहर प्रतिनिधि

Related Articles

Back to top button
Close
Close