माजी आमदार श्री. अमरभाऊ काळे यांनी आर्वी विधानसभा मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देऊन आढावा घेतला.

*माजी आमदार श्री. अमरभाऊ काळे यांनी आर्वी विधानसभा मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देऊन आढावा घेतला.*
मागील काही दिवसांपासून आर्वी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अमर काळे यांनी आर्वी तालुक्यातील रोहना व खरांगना, आष्टी तालुक्यातील अंतोरा व साहूर आणि कारंजा तालुक्यातील सारवाडी व कन्नमवार ग्राम येथील प्रथिमिक आरोग्य केंद्रांना भेट देऊन कोरोना परिस्तिथीचा,लसीकरणाचा आढावा घेतला.ह्या दौऱ्यावर असतांना श्री. अमर काळे यांनी डॉक्टरांशी,आरोग्य कर्मचार्यांशी चर्चा केली व सर्व सुविधांची पाहणी केली.आरोग्य यंत्रणेला येणाऱ्या अडचनिंचा शासन स्तरावर पाठपुरावा करेल असं अमरभाऊ काळे यांनी सांगितले.तोच पाठपुरावा अमरभाऊ काळे यांनी दि.१ मे ,२०२१ ला पालकमंत्री श्री.सुनीलजी केदार हे आर्वी विधानसभा मतदारसंघात कोरोना परिस्थिती चा आढावा घेत असताना अनेक मागण्या निवेदनाच्या माध्यमातून केल्या .मतदारसंघातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेत असताना श्री. अमरभाऊ काळे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे यांना पत्र पाठविले आहे ज्यात त्यांनी राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याकरिता राज्यातील सर्व आमदारांचा एक वर्षाचा स्थानिक निधी कोरोना संसर्ग रोखण्याकरिता वळता करण्याची मागणी केली आहे.नुकताच अमरभाऊ काळे यांच्या माध्यमातून ग्रामीण रुग्णालय, आष्टी करीत स्वतंत्र रुग्णवाहिका सुद्धा मंजूर झाली असून आता सेवे साठी उपलब्ध झाली आहे.आढावा घेत असताना आर्वी,आष्टी व कारंजा येथे कोविड केअर सेन्टरची निर्मिती करणेबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. सुनीलजी केदार यांना निवेदन दिले आहे.तिन्ही तालुक्यांच्या प्राथमिक अयोग्य केंद्रांचा आढावा घेत असताना काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य,ग्रामपंचायत सदस्यांसह पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
आर्वी शहर प्रतिनिधि 04-05-2021