आर्वी / वर्धा जिला की ख़बर

प्रहारच्या दणक्याने ५ वर्षांपासूनचा पाण्याचा प्रश्न निकाली”प्रहारचे अरसलान खान यांच्या प्रयत्नांना यश

VIGYAPAN
photostudio_1634614114400
photostudio_1633317682627
IMG-20211129-WA0031

*”प्रहारच्या दणक्याने ५ वर्षांपासूनचा पाण्याचा प्रश्न निकाली”*

*प्रहारचे अरसलान खान यांच्या प्रयत्नांना यश*

दिनांक २६ एप्रिल २०२१ रोजी आंदोलन सम्राट बाळा जगताप यांच्या मार्गदर्शनात प्रहारचे अरसलान खान यांच्या नेतृत्वात आर्वी शहरातील प्रभाग क्रमांक : ११ मधील गौरक्षण वार्ड , खडकपुरा, वाल्मीक वार्ड, ग्रामीण रुग्णालय व पंचायत समिति समोरील संपूर्ण क्षेत्रातील लोक ५ वर्षापासून पाण्याच्या टंचाईचा सामना करत होते मात्र फक्त १० दिवसात आंदोलन सम्राट बाळा जागताप यांच्या मार्गदर्शनात हा प्रश्न निकाली निघाला।
जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा विभाग आर्वी यांना निवेदन देऊन पाण्याची समस्या निकाली काढण्याकरिता विनंती केली होती.. सदर समस्या कायम स्वरुपी निकाली न लागल्यास प्रहार स्टाईल आंदोलन करण्याची चेतावणी सुद्धा प्रहारचे अरसलान खान यांनी दिली होती. ज्या आर्वी शहरात एकाच पक्षाचे सर्व २३ नगरसेवक व त्याच पक्षाचे आमदार असताना आर्वीकर जनतेला पाण्यासाठी पायपीट करावी लागणे दुर्दैवी आहे.
लोकप्रतिनिधी आपल्या समस्या ऐकण्याच्या मानसिकतेत नसल्याकारणाने तेथील स्थानिक जनतेने आपला प्रश्न अरसलान खान यांच्या कडे मांडला व लगेच वेळप्रसंगी आंदोलनात्मक भूमिका घेण्याची तयारी प्रहार ने दाखवल्यामुळे निद्रिस्त प्रशासन खडबडून जागे झाले. व सदर तिन्ही वॉर्डातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याकरिता पाईप लाईन टाकण्याचे काम चालू झाले. व सामान्य जनतेला प्रहारच्या माध्यमातून अखेर न्याय मिळाला.. गौरक्षण वार्ड , खडकपुरा, वाल्मीक वार्ड, ग्रामीण रुग्णालय व पंचायत समिति समोरील संपूर्ण क्षेत्रातील जनतेने त्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावल्यामुळे आंदोलन सम्राट बाळाभाऊ जगताप, प्रहारचे कार्याध्यक्ष अरसलान खान, मोहम्द अनवर, शाहरुख खान, युनुस अहमद, अब्दुल नाज़ीम व सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानत आनंद व्यक्त केला. या सोबतच प्रहार चे कार्यध्यक्ष अरसलान खान यांनी पानी पुरवठा विभाग वर्धा मदनकर साहेब, मून साहेब वर्धा, वाघ साहेब आर्वी, राजेशजी कात्रे व कांट्रेक्टर रविन्द्रजी यांनी हा अतिआवश्यक प्रश्न लवकरात लवकर सोड़ावल्या बद्दल या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद मानले।

आर्वी शहर प्रतिनिधि 11-05-2021

Related Articles

Back to top button
Close
Close