आर्वी / वर्धा जिला की ख़बर

आर्वी नगर परिषदचा सुसज्ज विलगिकरन कक्ष सुरू*

photostudio_1601020483281 (1)
VIGYAPAN
photostudio_1627621229111
photostudio_1627808634241
IMG-20210801-WA0159
photostudio_1630559959758

*नगर परिषदचा सुसज्ज विलगिकरन कक्ष सुरू*

आर्वी 11-05-2021

सध्या सुरू असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता व कोरोना रुग्णांना घरी विलगिकरनात राहतांना जागेची अडचण लक्षात घेता नगर परिषद आर्वी द्वारा गुरुनानक धर्मशाळा येथे सुसज्ज असा विलगिकरन कक्ष सुरू केला आहे.
यासंदर्भात नगराध्यक्ष प्रा प्रशांत सव्वालाखे यांनी विविध सामाजिक संघटना, नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी यांच्याशी चर्चा करून येथील कोरोना रुग्णाकरिता सर्व सोयीसुविधा उपलब्ध केल्या आहेत.
आर्वी सिंधी समाजातर्फे सुसज्ज मंगल कार्यालय विनामूल्य उपलब्ध करून दिले आहे. प्रत्येक रुग्णाला स्वतंत्र पलंग, गादी, चादर व किट याची व्यवस्था शिक्षक मित्र परिवार यांनी केली तर दोन वेळचे जेवण चहा व ज्युस मनभावन कला व क्रीडा मंडळ करणार आहे. स्वच्छता व कक्ष नियंत्रण ठेवण्यासाठी नगर परिषदद्वारे विशेष पथक तयार केले असून सकाळ संध्याकाळ दोन वेळा रुग्णांचे ऑक्सिजन लेव्हल, शरीराचे तापमान व आवश्यक वैद्यकीय सल्ला यासाठी स्थानिक डॉक्टर सेवा देणार आहेत.
सुसज्ज विलगिकरन कक्ष कोरोना रुग्णांकरिता सुरू करण्यापूर्वी त्याची माहिती देण्यात आली. याप्रसंगी नगराध्यक्ष प्रा प्रशांत सव्वालाखे, उपविभागीय अधिकारी हरिश धार्मिक, तहसीलदार विद्यासागर चव्हाण, उपमुख्यधिकारी रणजित पवार, अभियंता साकेत राऊत, आरोग्य सभापती प्रकाश गुल्हाने, बांधकाम सभापती कैलास गळहाट, सिंधी समाजाचे सुदामा मोटवानी, सुरेश बुधवानी, टेकचंद मोटवानी, शिक्षक मित्र परिवारचे मंगेश कोल्हे, अविनाश टाके, प्रकाश बनसोड, नरेंद्र पखाले, रवि गोहत्रे, सुधीर टरके मनभावन कला क्रीडा मंडळाचे संदीप शिंगाने, अन्सार भाई, नगरसेवक जगन गाठे, रामु राठी, मिथुन बारबैले, अभियंता सुरेंद्र चोचमकर, आरोग्य निरीक्षक सुनिल आरीकर,प्रशांत सोनवाल, रुपेश जळीत,अरुण पंड्या, शिवा चिमोटे, राहुल जाधव, जळीत, देवराव आदी उपस्थित होते. विलगिकरन कक्ष सुसज्ज करण्यासाठी उपमुख्यधिकारी रणजित पवार, अभियंता साकेत राऊत व सुरेन्द्र चोचमकर यांनी विशेष प्रयास केले.
नगराध्यक्ष प्रा सव्वालाखे यांनी सिंधी समाज, शिक्षक मित्र परिवार, मनभावन कला व क्रीडा मंडळ, डॉक्टर मंडळी आदींचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले.

आर्वी प्रतिनिधि
11-05-2021

Related Articles

Back to top button
Close
Close