डॉ राणे गोल्ड अवॉर्ड ने सन्मानित, इमेज बिल्डिंग कॅटेगिरी अंतर्गत पटकावला गोल्ड अवॉर्ड* *माझा हा पुरस्कार कोरोना महामारीच्या या भीषण परिस्थितीत समाजकार्य करणाऱ्या लायन्सला समर्पित….. डॉ राणे*

*डॉ राणे गोल्ड अवॉर्ड ने सन्मानित*
*इमेज बिल्डिंग कॅटेगिरी अंतर्गत पटकावला गोल्ड अवॉर्ड*
*माझा हा पुरस्कार कोरोना महामारीच्या या भीषण परिस्थितीत समाजकार्य करणाऱ्या लायन्सला समर्पित….. डॉ राणे*
पुणे येथे चवथे मल्टिपल कॉन्व्हेंशन साईपल “सत-चित-आनंद” नुकतेच पार पडले .संगमनेर येथील प्रसिद्ध मालपाणी उद्योगाचे संचालक गिरिषभाऊ मालपाणी यांनी मल्टिपल कौन्सिल चेयरमन म्हणून या कॉन्व्हेंशन चे यशस्वी आयोजन केले .या
मल्टिपल मध्ये महाराष्ट्रातील मुंबई सोडून बाकी सर्व जिल्ह्यातील चारही (D1,D2,H1,H2) मल्टिपलच्या लायन्स क्लबचे पदाधिकारी ऑनलाइन उपस्थीत होते . या कारेक्रमा मध्ये डिस्ट्रिक्ट 3234H1 चे डिस्ट्रिक्ट ऍक्टिव्हिटी चेअरपर्सन व प्रसिध्द अस्थीरोग तझ *डॉ रिपल राणे* यांना *”इमेज बिल्डिंग”* या कॅटेगिरी अंतर्गत *गोल्ड अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले*.
डिस्ट्रिक्ट 3234H1 मध्ये नागपूर,भंडारा, गोंदिया ,वर्धा अमरावती ,यवतमाळ व गडचिरोलि या सात जिल्ह्यांचा समावेश असून या सर्व जिल्ह्यातील 100 हुन अधिक लायन्स क्लब्जचा यात सामावेश आहे व वर्ष 20-21 साठी डॉ राणे यांची डिस्ट्रिक्ट 3234H1 साठी डिस्ट्रिक्ट ऍक्टिव्हिटी चेअरपर्सन म्हणून डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संदीपजी खंडेलवाल द्वारा नियुक्ती करण्यात आली होती.
कोरोनाच्या या भीषण परिस्थितीमध्ये सुद्धा लायन्स क्लबच्या सर्व क्लबद्वारे अनंत सामाजिक उपक्रम या वर्षी वरील सर्व जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यात आले, यामध्ये एकाच आठवड्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करून एकविशचे(2100) बॉटल रक्त गोळा करून विविध हॉस्पिटलला उपलब्ध करून देणे, ऑक्सिजन प्लांटची निर्मिती करून गरजू रुग्णांपर्यंत ऑक्सिजन पोहचवणे ,कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड व अबुलन्स सेवा उपलब्ध करून देणे, हंगर रिलीफ अंतर्गत गरजुना भोजन उपलब्ध करून देणे ,महिला सक्षमीकरना अंतर्गत महिलांना सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबविने ,या अश्या अनेक उपक्रमाद्वारे समाज कार्याचे आयोजन करून डॉ रिपल राणे यांच्या नेतृत्वात वरील सर्व सातही जिल्ह्यातील लायन क्लबजनि वर्षभर नागरिकांना मदत केली आहे व त्यामुळेच डॉ रिपल राणे याना मल्टिपल कॉन्व्हेंशन “साईपल” येथे श्रीमान गिरीश भाऊ मालपानि यांचे हस्ते गोल्ड अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले.
या पुरस्काराचे सर्व श्रेय डॉ राणे यांनी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर श्री संदीपजी खंडेलवाल, सर्व क्लबचे पदाधिकारी तसेच डिस्ट्रिक्ट 3234H1 चे सर्व वरिष्ठ मार्गदर्शक याना दिले आहे व या पुढेही लायन्स क्लबद्वारे समाज कार्य व गरजूंची सेवा निरंतर सुरू राहील असे प्रतिपादन डॉ रिपल राणे यांनी
केले.
आर्वी शहर प्रतिनिधि