आर्वी / वर्धा जिला की ख़बर

सुमित वानखेडे यांच्या माध्यमातून नानाजी देशमुख प्रतिष्ठान मुंबई व्दारे १० अॉक्सिजन कॉन्सेंट्रटर्स सूपुर्द 

VIGYAPAN
photostudio_1634614114400
photostudio_1633317682627
IMG-20211129-WA0031

सुमित वानखेडे यांच्या माध्यमातून नानाजी देशमुख प्रतिष्ठान मुंबई व्दारे १० अॉक्सिजन कॉन्सेंट्रटर्स सूपुर्द

आर्वी उपजिल्हा रुग्णालयास सुमित वानखेडे यांनी नानाजी देशमुख प्रतिष्ठान मुंबई यांच्या माध्यमातून रतन निधी ट्रस्टच्या वतीने १० अॉक्सिजन कॉन्सेंट्रटर्स डॉ. सुटे, डॉ. कोल्हे, डॉ. सोनी, डॉ. देवकाते यांना डॉ. अरूण पावडे, नंदकुमार दिक्षित, निखील कडू, रितेश लूनावत सदस्य नानाजी देशमुख प्रतिष्ठान मुंबई यांच्या प्रमुख उपस्थितीत सुमित वानखेडे मित्र परीवाराने सुपूर्त केले. सुमित वानखेडे आर्वी करीता नेहमीच कार्यरत आहेच विशेषतः कोरोना संकटात नानाजी देशमुख प्रतिष्ठान मुंबई यांच्या माध्यमातून अनेक गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूसह आरोग्याशी निगडित साधने तथा औषधी नेहमीच पुरवित असतात.

रुग्णालयातही ऑक्सिजन बेड लवकर उपलब्ध होत नाही. त्यामुळे रुग्णाची स्थिती खालावते व अनेक रुग्ण उशिरा वैद्यकीय मदत व ऑक्सिजन मिळाल्याने अचानक श्वास घ्यायला त्रास होतो, ज्या रुग्णांची ऑक्सिजन पातळी ९० पेक्षा खाली जात आहे, अशा रुग्णांना रुग्णालयात बेड उपलब्ध होईपर्यंत हे ऑक्सिजन कॉन्सट्रेटर फायद्याचे ठरत आहे. कोविडमध्ये अनेक रुग्णांची ऑक्सिजन पातळी अचानक खाली जाऊन तो रुग्ण गंभीर होतो. अशा रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन उपलब्ध न झाल्यास, त्यांच्या शरीरातील कार्यप्रणालीवर विपरित परिणाम होऊ शकतो. त्यांना याचा लाभ होणार आहे.

यावेळी जितेंद्र ठाकरे, परवेज साबीरभाई, बाळाभाऊ सोनटक्के, योगेश ताजनेकर, निखिल कडू समन्वयक वर्धा जिल्हा सरपंच संसद एमआयटी पुणे आदींची उपस्थिती होती.

आर्वी शहर प्रतिनिधि

Related Articles

Back to top button
Close
Close