हुनर/TALENT

इंटरनॅशनल आइडल पुरस्काराने ने अक्षय राजेश अहिव होणार सन्मानित कला क्षेत्रात करत असलेल्या कामा बद्दल मिळणार पुरस्कार

VIGYAPAN
photostudio_1634614114400
photostudio_1633317682627
IMG-20211220-WA0000
photostudio_1641553606755
IMG-20220117-WA0083
IMG-20220116-WA0000

इंटरनॅशनल आइडल पुरस्काराने ने अक्षय राजेश अहिव होणार सन्मानित

कला क्षेत्रात करत असलेल्या कामा बद्दल मिळणार पुरस्कार

आर्वी – वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील रहिवासी पत्रकार राजेश अहिव यांचा चिरंजीव अक्षय अहिव यांना नुकताच निर्वाण फाउंडेशन नाशिक च्या वतीने दिला जाणारा इंटरनॅशनल आइडल पुरस्कार २०२१ जाहीर झाला आहे. कोरोनाचा काळ संपल्या नंतर शाही कार्यक्रमात हा पुरस्कार अक्षय अहिव यांना प्रदान करण्यात येणार आहे.

कला क्षेत्रात करत असलेल्या कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार अक्षय यांना देण्यात येणार आहे. अक्षय यांनी आता पर्यंत सामाजिक विषयावर आधारित सहा लघुचित्रपटांची निर्मिती केली आहे. लघुचित्रपटांना महाराष्ट्र शासन व भारत सरकारची पुरस्कार मिळाले आहेत. अक्षय मल्हार फिल्म आर्टचे संस्थापक असून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या भरारी पथक समितीला महत्वाच्या पदाला आहेत. विविध कला क्षेत्राचे कार्यक्रम राबवून नवं कलाकारांना नेहमी मार्गदर्शन करत असतात. आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सव समितीचे ते अध्यक्ष असून चित्रपट महोत्सव स्वतः भरवून नवोदित फिल्म मेकर्स व विदर्भातील तसेच ग्रामीण भागातील कलाकारांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतात.

कला क्षेत्राबरोबरच अक्षय यांना सामाजिक कार्याची सुद्धा आवड आहे विविध गरजवंताना सुद्धा अक्षय मदत करत असते. कोरोनाच्या या महामारीत सुद्धा मल्हार फिल्म आर्टच्या वतीने एप्रिल 2020 मध्ये आर्वी तालुक्यातील कवाडी येथील पारधी बेड्यावर गरजू लोकांना किराणा किट व अत्यावश्यक वस्तूचे वाटप केले होते. तसेच 2021 मध्ये सुद्धा सतत मदत करत आहे. तसेच अक्षय निसर्ग प्रेमी असून दरवर्षी पावसाळ्या ठराविक झाडे लावून त्याची काळजी घेतो. या सर्व कार्याची दखल घेत त्यांना निर्वाण फाउंडेशन च्या वतीने इंटरनॅशनल आइडल पुरस्कार जाहीर झाला. अक्षयनी याच सर्व श्रेय आपल्या आई-वडील मोठे वडील काका भाऊ मित्र व परिवारा सोबत मल्हार फिल्म आर्टच्या सर्व सहकार्याच व त्यांना नेहमी मार्गदर्शन, सहकार्य व मदत करणाऱ्या सर्वांना जाते असे म्हटलं. निर्वाण फाउंडेशनचे अक्षय नी आभार मानले.

महारोगी सेवा समिती सचिव आंदवण डॉ.विकास बाबा आमटे, माजी राज्यमंत्री मधुकरराव कांबळे, आर्वीचे उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, तहसीलदार विद्यासागर चव्हाण, उपविभागीय पुलीस अधिकारी सुनील साळुंखे, कारंजा तहसीलदार सचिन कुमावत, हिंगणघाट ठाणेदार संपत चव्हाण, डॉ. अरुण पावडे, डॉ.रोशन जवळेकर, डॉ.श्यामसुंदर भुतडा, डॉ.सचिन पावडे, डॉ.नंदकिशोर कोल्हे, डॉ.विना वाठोरे, नाट्य मालिका चित्रपट दिग्दर्शक राज कुबेर, लेखक दिग्दर्शक प्रा.डॉ. सतीश पावडे, नाट्य चित्रपट दिग्दर्शक हरीश इथापे, निवेदिका अभिनेत्री रुपाली मोरे, अभिनेत्री रसिका चव्हाण, पत्रकार पराग ढोबळे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व मल्हार फिल्म आर्टचे सर्व पदाधिकारी मित्र मंडळाच्या वतीने अक्षयच कैतुक करत शुभेच्छा दिल्या.

Back to top button
Close
Close